धनगर समाजाचा एसटी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा पहुर येथे साखळी उपोषणाला सुरुवात - दैनिक शिवस्वराज्य

धनगर समाजाचा एसटी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा पहुर येथे साखळी उपोषणाला सुरुवात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर, २२ सप्टेंबर  धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एसटी प्रवर्गातून अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाने राज्यव्यापी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागणीच्या समर्थनार्थ जामनेर तालुक्यातील पहुर येथे आज साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली. उपोषणाचे आयोजन पहूर बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी किरण भास्कर पाटील, अमोल अजय पांढरे या धनगर समाज बांधवांनी उपोषणाला प्रारंभ केला. यापूर्वी, अहिल्याबाई होळकर नगरातून ढोल ताशांच्या गजरात एक भव्य रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये समाजातील मोठ्या संख्येने बांधवांनी सहभाग घेतला.

रॅलीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, भास्कर दादा पाटील, शिवसेनेचे व धनगर समाजाचे नेते गणेश पांढरे, रामेश्वर पाटील, समाधान पाटील, एडवोकेट एस. आर. पाटील, श्याम सावळे, कृषी सभापती माजी संजय देशमुख, संजय तायडे, विनोद पाटील, सुनील पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

धनगर समाजाच्या या आंदोलनास जोरदार पाठिंबा मिळत असून, एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण पुढील काही दिवस चालणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads