जामनेरात पारंपारिक पद्धतीने बारागाड्या उत्सव साजरा.... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात पारंपारिक पद्धतीने बारागाड्या उत्सव साजरा....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा शेकडो वर्षांपासूनची परंपरा जोपासत जामनेर शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदानावरील मंमादेवी ते हनुमान मंदिर जवळील श्रीराम मंदिरा पर्यंत" विजय शिरसाठ" या भक्तांकरवी बारागाड्या ओढण्याची प्रथा आजच्या युगात टिकून आहे. सविस्तर माहिती अशी शहरात असलेल्या श्रीराम पेठ भागातील पुरातन काळातील " खंडेराव महाराज" यांचे जाग्रुत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पोळ्यांच्या दुसर्‍या दिवशी या बारागाड्या ओढल्या जातात. मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात हा भव्य दिव्य सोहळा साजरा केला जातो. आजच्या इंटरनेट युगात किंचीतही हा बारागाड्याचा सोहळा कमी झालेला दिसुन येत नाही तसेच श्रीराम पेठ वासीयांकडुन परंपरा आज गायत टिकवली जात आहे. डोळ्यांचे पारणे फिटेल असा भव्य दिव्य उत्सव बघण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच शहरातुन नागरीकांचा जणु महासागर उसळलेला होता. नंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते तर हा सोहळा अनेकांनी मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद करून घेतला. जामनेर नगरपरिषदेच्या वतीने दिवाबत्ती व आरोग्य विभागाचे मोठे सहकार्य लाभले. बारागाड्या उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनचे पो. नि. मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads