अखेर पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मोहन सूर्यवंशीचे मृतदेह ओझर खुर्द येथील केटी वेअर परिसरात आढळला..
जामनेर तालुक्यातील शहापूर येथील खडकी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मोहन पंडित सूर्यवंशी (वय 40 वर्ष) यांचे शव ओझर खुर्द येथील केटी वेअर परिसरात आढळून आले आहे. ही घटना दोन दिवसा अगोदर दुपारी ४ वाजता घडली होती आणि तात्काळ घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आणि तहसीलदार यांना दिली होती.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्या नेतृत्वाखाली SDRF टीमने शोधकार्य सुरू केले होते. अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले होते, परंतु सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. अखेर आज ओझर खुर्द येथील केटी वेअर परिसरात मोहन सूर्यवंशी यांचे मृतदेह आढळून आले.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, तहसीलदार, आणि SDRF टीमने त्वरित घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले. स्थानिक प्रशासनाने पुढील कार्यवाहीसाठी तयारी सुरू केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा