जामनेरात जैन पर्युषण पर्व उत्साहात संपन्न..
जामनेर: येथील ऐतिहासिक आणि पुरातन पारसनाथ देवस्थानात जैन धर्मीयांचे पवित्र पर्युषण पर्व अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या मंदिराला १५० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा वारसा असून, यंदाचे पर्युषण पर्व विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी समृद्ध होते.पर्वाची सांगता भव्य मिरवणुकीने करण्यात आली, ज्यामध्ये सजवलेल्या अश्व रथावर इंद्र भरत सैतवाल आणि इंद्राणी सौ. सुरेखा सैतवाल यांचा सहभाग होता. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये परिधान केलेल्या भाविकांनी पंचरंगी जैन ध्वज घेत जलयात्रेत सहभाग घेतला. दररोज सकाळी अभिषेक, पूजापाठ, प्रवचन, आणि स्वाध्यायाच्या माध्यमातून धर्मज्ञान वृद्धीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दहा दिवसांच्या पर्वामध्ये युवक-युवतींसाठी विविध धार्मिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये यशस्वी स्पर्धकांना गौरवण्यात आले. तसेच, शालेय विद्यार्थ्यांसह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला.
जैन साहित्य परिषदेच्या वतीने प्राचीन ग्रंथांचे प्रदर्शन आणि जिनवाणी सजावट स्पर्धाही यावेळी घेण्यात आली. जलयात्रेचे मुख्य आकर्षण पारसनाथ ढोल पथक होते, ज्यामुळे मिरवणुकीला अनोखा रंग चढला.
या विशेष कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, शिक्षण संस्थेचे सचिव सुरेशचंद्र धारिवाल, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई चौधरी, नगरसेवक अतिष झाल्टे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे, डॉ. स्वप्नील सैतवाल, महेंद्र नवलखा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश सैतवाल, कार्याध्यक्ष विजय सैतवाल, सचिव राजेंद्र नारळे, उपाध्यक्ष भरत सूर्यवंशी, सहसचिव संजीव सैतवाल, संचालक प्रशांत सैतवाल, राजेंद्र चतुर, राजू डिकेकर, राजेंद्र खोबरे, रविंद्र मिटकर, रविंद्र जैन, सुदर्शन सैतवाल, दिनेश सैतवाल यांच्यासह महिला मंडळाच्या अध्यक्ष राजुल कस्तुरे, सुनीता विजय सैतवाल, संगीता कस्तुरे आणि इतर मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमामुळे जामनेरातील जैन समाजात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा