महाराष्ट्र
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मळसिद्ध मुगळे यांची 'विकास संवाद' यात्रा ; सर्वत्र ग्रामस्थांकडून उस्फूर्त प्रतिसाद...
समीर शेख प्रतीनिधी
सोलापूर (मंद्रूप): गुरुवार दि. १९ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मळसिद्ध मुगळे यांची 'विकास संवाद' यात्रा (गाव भेट दौरा) हा हत्तूर, वडकबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी, गुजेगांव, अकोले मंद्रूप, कंदलगांव, अंत्रोळी, वडापूर या गावात 'विकास संवाद' यात्रा संपन्न झाली.
भाजपाच्या विरोधात सोलापूर लोकसभेचा निकाल लागल्यामुळे खांदेपालटची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तरीपण, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून मंद्रूपचे सुपुत्र तथा उद्योजक मळसिध्द मुगळे यांच्या नावाची चर्चा यांनाच 'भाजपा' ची उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याच्या या संवाद यात्रा गाव भेट दौऱ्यात शेतकरी व युवक वर्ग बहुसंख्येत सर्व गावात उपस्थित दिसत आहे.या संवाद यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अंत्रोळी येथे मळसिद्ध मुगळे यांचा ग्रापंचायत व ग्रामस्थांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
लोकसंवाद यात्रेदरम्यान मंद्रूपचे युवा उद्योजक व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे व त्यांच्या टीमने अंत्रोळी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी मळसिद्ध मुगळे म्हणाले की, आपल्या सर्वाचे आशीर्वाद व साथ सोबत असेल तर मी विधानसभा लढवण्यास भूमिपुत्र म्हणून तयार आहे असे ते म्हणाले
यावेळी गावचे ज्येष्ठ नेते मजनोद्दीन पठाण, आनंदा कर्वे, ब्रम्हदेव सलगरे व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य इनुस शेख, बाबा बंडगर यांनी गावच्या विविध समस्येच्या व्यथा मांडल्या व त्यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थ यांनी भूमिपुत्र म्हणून आम्ही तुम्हा सहकार्य नक्कीच करू अशी ग्वाही दिली.
यावेळी या कार्यक्रमास मजनोद्दीन पठाण, सरपंच सलगरे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बंडगर , इन्नूस शेख, नेताजी थोरात, आनंदा कर्वे, सरफराज शेख,रियाज पटेल, नागनाथ कोळी,अविनाश कर्वे,अजय कर्वे, भारत बंडगर, भाऊराव बेलदार,संतोष कोकरे,पिंटु गोरनाळे, सागर कर्वे, दयानंद कर्वे व ग्रामस्थ बहुसंख्येत उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा