प्रकाशचंद जैन ॲक्युपंक्चर कॉलेजला शासनाची मान्यता..शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी
जामनेर पळासखेडा बुद्रुक, तालुका जामनेर येथील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या प्रकाशचंद जैन ॲक्युपंक्चर कॉलेजला शासनाची मान्यता मिळाली आहे. संस्थेला यासंदर्भात पत्रही प्राप्त झाले आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव मनोज कुमार कावडीया यांनी दिली.महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने राज्यातील विविध संस्थांकडून ॲक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. या प्रस्तावांमध्ये प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचा प्रस्ताव सक्षमता तपासणी समितीने मंजूर केला. समितीच्या शिफारशींनुसार 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी 50 विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह या नव्या ॲक्युपंक्चर कॉलेजला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेचे प्रबंधक नारायण नवले यांनी संस्थेला मान्यतेचे पत्र नुकतेच दिले आहे, अशी माहिती कावडीया यांनी दिली.प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेने जामनेर तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथे 30 एकर जागेत विविध शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे सुरू केले आहेत. यामध्ये बी.ए.एम.एस. मेडिकल कॉलेज, डी.एच.एम.एस. वैद्यकीय महाविद्यालय, फिजिओथेरपी महाविद्यालय, जी.एन.एम. नर्सिंग कॉलेज, डी.फार्मसी, बी.फार्मसी, एम.फार्मसी अशा शैक्षणिक शाखांचा समावेश आहे. या संस्थेमध्ये जैन इंटरनॅशनल स्कूल, ज्युनिअर कॉलेज, अकरावी-बारावी सायन्ससारखे इतर अभ्यासक्रम देखील सुरू आहेत.राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी या संस्थेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. याशिवाय, संस्थेचे सचिव मनोज कुमार कावडीया यांनी लवकरच "प्रायव्हेट युनिव्हर्सिटी" स्थापन करण्याचा मानसही व्यक्त केला आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा