गौरीपुजनाच्या मुहूर्तावर जामनेरमध्ये १०० हून अधिक महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया.. - दैनिक शिवस्वराज्य

गौरीपुजनाच्या मुहूर्तावर जामनेरमध्ये १०० हून अधिक महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरावर ग्रामीण महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गौरी-गणपती आणि महालक्ष्मी सारख्या सणांच्या काळात सुद्धा जामनेर आरोग्य विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
शस्त्रक्रियांसाठी डॉ. जयश्री पाटील, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. समाधान वाघ, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. कोमल देसले, डॉ. किरण पाटील, डॉ. चारुशीला ठाकूर, डॉ. प्रियांका बंडवाल यांच्यासह आशा तायडे, मीरा कांबळे, निर्मला बालोद, माया गहिरवर, सुषमा धनगर, कल्पना पालीवाल, आशा कुयटे, राजश्री पाटील, सुरेखा गोसावी, मीरा पांढरे, शोभा घाटे, प्रतिभा घुगे, शीतल रोकडे, संगिता नाईक, अर्चना बनकर, कविता राणे, कविता तायडे, भूमिका चौधरी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
या शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, डॉ. नरेश पाटील, डॉ. दानिश खान, डॉ. संदीप कुमावत, सुनील सूर्यवंशी, बशीर पिंजारी, प्रवीण दाभाडे, गोपाळ पाटील, विक्रम राजपूत, पुंडलिक पवार, दिनकर माळी, किशोर पाटील, रविंद्र सूर्यवंशी, जगदीश सोनार, भुपेंद्र लोखंडे, शुभम अग्रवाल, विकेश भोई, सागर पाटील, प्रकाश तेजकर, कुलदीप सुनगत, ईश्वर कोळी, दीपक मोरे, त्र्यंबक तंवर यांचेही अनमोल सहकार्य लाभले. 
या शिबिराच्या आयोजनामुळे ग्रामीण भागातील महिलांना चांगल्या आरोग्य सेवांचा लाभ मिळाला असून, सर्वांचे काम उल्लेखनीय आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads