झेरॉक्स दुकानदाराची आत्महत्या... परिसरात खळबळ
पाचोरा शहरातील पोलिस स्टेशनजवळील झेरॉक्स व्यवसायिक परभतसिंग केसरसिंग राजपुत (वय ५२, रा. पांडव नगरी, पाचोरा) यांनी त्यांच्या गणेश झेरॉक्स दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नाही, ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.परभतसिंग राजपुत हे झेरॉक्स व तहसिल कार्यालयास लागणारे अर्ज विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवित होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने परभतसिंग राजपुत हे सकाळी ८ वाजता घरून बाहेर पडले. दुकानाकडे जात असताना, काही मित्रांसोबत त्यांच्या गप्पा झाल्या. त्यानंतर ८:३० वाजता दुकान उघडून ते आत गेले, आणि काही वेळातच त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, आणि पुढील तपास सुरू आहे. परभतसिंग राजपुत यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या पाश्चात्य आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शांत आणि हसमुख स्वभावाचे परभतसिंग राजपुत यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कोणत्याही व्यक्तीने अशा टोकाच्या पावलांचा विचार करू नये. अशा संकटाच्या प्रसंगी, जवळच्या व्यक्तीशी बोलणे आणि मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा