महाराष्ट्र
मंद्रूप पोलीस ठाणेतर्फे गणेश मंडळासाठी स्पर्धेचे आयोजन.... मंगळवारी, गतवर्षीचे उत्कृष्ट मंडळांना बक्षीस वितरण होणार....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३८ गावातील गणेश तरूण मंडळासाठी यंदाही विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळानी सहभाग नोंदवा असे आवाहन मंद्रूपचे नूतन पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले आहे.
दरवर्षी मंद्रूप पोलीस ठाणे यावर्षीही ३८ गावातील सर्व गणेश तरुण मंडळासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम, पर्यावरण पूरक गणेशोत्सव आणि पारंपरिक व शिस्तबद्ध मिरवणूक या तीन निकषाखाली उपक्रम राबवावेत.मंद्रूप पोलिस ठाण्याचे एक परिक्षक पथक गावागावातील प्रत्येक गणेश मंडळाला भेट देऊन मंडळांनी राबवलेल्या विविध उपक्रमाची पाहणी करेल. जो मंडळ सर्वोत्कृष्ट उपक्रम राबवेल त्याला प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येईल.त्या मंडळाला पोलीस ठाणेकडून पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन पोलिस अधीक्षक यांच्याहस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
गणेश मंडळांनी विविध समाजपयोगी उपक्रम राबवावेत, मुला-मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा घ्यावेत.गोर-गरींबाना तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची मदत करावेत.आरोग्य व रक्तदान शिबीर घ्यावेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा. शिस्त व पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढावेत. शासनाने व न्यायालयाने दिलेले विविध आदेशाचे व सूचनांचे पालन सर्व मंडळांनी करावेत. सर्वांनी एक दिलाने शांततेने व एकोपने हा गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.
🔴मंगळवारी गतवर्षीचे बक्षीस वितरण....
२०२३ साली मंद्रूप पोलिस ठाणेकडून असाच उपक्रम राबविण्यात आला होता.मात्र, विविध कारणांमुळे तेव्हा बक्षीस वितरण सोहळा पार पडू शकला नाही.मंगळवारी २०२४ रोजी सकाळी दहा वाजता मंद्रूप पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,उपविभागीय पोलिस अधिकारी
संकेत देवळेकर यांच्या उपस्थितीत २०२३ चा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.याचवेळी रक्तदान शिबीर आणि गणेशोत्सव मंडळांना झाडे वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा