दिलीप खोडपे सर यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश थोड्याच वेळात. जयंत पाटील, अमोल कोल्हे, यांचे आगमन, कार्यकर्त्यांचा उत्साह उंचावला
जामनेर: नेरी येथील नेते दिलीप खोडपे यांच्या शरद पवार गटातील प्रवेश सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, यांनी कार्यक्रमस्थळी आगमन केले आहे. या नेत्यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, जयघोष, ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसर जल्लोषमय झाला आहे.कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्ते आणि जनसमुदायात मोठी उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा