जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा: जनजागृतीचे विविध कार्यक्रम
जामनेर: संचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग महाराष्ट्र राज्य, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे यांच्या आदेशानुसार जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळांमधील विद्यार्थ्यांना रेबीजबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती केली गेली.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी नागरिकांना प्राणी किंवा कुत्रा चावल्यानंतर आवश्यक काळजी घेण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले, “चावा झाल्यानंतर २४ तासांच्या आत अँटी-रेबीज लस घेणे गरजेचे आहे. मोठ्या जखमेसाठी जिल्हा रुग्णालयात रेबीज सीरम घेणे आवश्यक आहे. तसेच, जखम वाहत्या पाण्याने ३ ते ५ मिनिटे धुवून डॉक्टरांनी दिलेले सर्व डोस पूर्ण करावेत.
पूर्वी १४ इंजेक्शनची पद्धत होती, मात्र आता नवीन संशोधनानुसार फक्त ३ ते ५ डोसची गरज असते. रेबीजच्या प्रतिबंधासाठी नागरिकांना आणि पाळीव प्राण्यांना लसीकरण करणे अनिवार्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा