शेंगोळा गावात बैल पोळा उत्साहात साजरा, सरपंचांनी बैलांना पुरणपोळीचा घास भरवला.. - दैनिक शिवस्वराज्य

शेंगोळा गावात बैल पोळा उत्साहात साजरा, सरपंचांनी बैलांना पुरणपोळीचा घास भरवला..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावात बैल पोळा उत्सव भव्य आणि आनंददायक वातावरणात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या बैलांना आदर देण्यासाठी गावातील प्रथम नागरिक, सरला मोहन बेलेकर सरपंच, यांनी त्यांना पुरणपोळीचा घास भरवून विशेष सन्मान दिला.
या उत्सवाला सरपंच सौ सरला मोहन बेलेकर, प्रतिभा समाधान गावंडे, कुरशान इरफान तडवी, शोभाबाई रमेश जोशी, संजय बाबुराव दाभाडे, माजी सरपंच हरीभाऊ मुळे, माजी सरपंच सुभाष भागवत यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी मधुकर बेलेकर, रमेश जोशी, पिरखा तडवी, जाबीर तडवी, समाधान गावंडे, मोहन जोशी, ज्ञानेश्वर गिरी, महेंद्र दाभाडे, प्रविण वंजारी, कैलास चिंधु जोशी, संजय सैंदाणे, अशोक गावंडे, एकनाथ बेलेकर, मनोज बेलेकर, प्रदिप बेलेकर, रविंद्र सनंसे, सागर बेलेकर आणि देवगीर गोस्वामी यांसारख्या अनेकांनी सहभाग घेतला.बैल पोळ्याच्या या उत्सवामुळे गावात आनंदाची लाट पसरली, आणि सर्वांनी एकत्र येऊन बैलांच्या कष्टाचे वंदन केले. या दिवशी गावातील वातावरण उत्साही आणि एकत्रित भावनांनी भरलेले होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads