जामनेरात शिवसृष्टी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात.. मंत्री गिरीश महाजन यांची पाहणी
जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प जामनेर शहरात साकारला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाची आज पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि अंतिम टप्प्यात असलेल्या या कामाचे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रकल्पाच्या पाहणीवेळी मंत्री महाजन यांनी संबंधित ठेकेदार, अभियंता आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी प्रकल्पाच्या कामाची गुणवत्ता आणि त्यातील अडचणींवर लक्ष केंद्रित केले. शिवसृष्टीचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.जामनेर शहरातील नागरिकांमध्ये या प्रकल्पाबद्दल प्रचंड उत्सुकता असून, शिवसृष्टीच्या उद्घाटनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा