प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथे प्रथमच पुरुष नसबंदी शिबीराचे आयोजन, नियमित शिबिरांचे नियोजन - दैनिक शिवस्वराज्य

प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथे प्रथमच पुरुष नसबंदी शिबीराचे आयोजन, नियमित शिबिरांचे नियोजन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमच पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे शिबीर आयोजित करण्यात आले. हे केंद्र जामनेर तालुक्यातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाते. 1958 साली केदारशेठ देहाडराय, ग्रामस्थ आणि आबाजी नाना पाटील यांच्या प्रयत्नाने हे केंद्र स्थापन झाले होते. केंद्रात महिलांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर नावाजले गेले आहे. 
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. दानिश खान यांच्या उपस्थितीत चार पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलांचे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत अनेकदा सात दिवस ऍडमिट राहावे लागत असल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी काही पुरुषांनी स्वतःवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शिबिरामध्ये डॉ. पल्लवी राऊत, डॉ. सागर पाटील, औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील, आरोग्य सहाय्यक विक्रम राजपूत आणि इतर आरोग्य सेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आगामी काळात वाकडी येथे नियमितपणे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे शिबीर आयोजित केले जाणार असल्याची माहिती जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांनी दिली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads