पाळधी गावात वेग नियंत्रक बसवण्यासाठी निवेदन, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा - दैनिक शिवस्वराज्य

पाळधी गावात वेग नियंत्रक बसवण्यासाठी निवेदन, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
पाळधी गावातील मुख्य बस स्थानक व महाराणा प्रतापसिंह चौफुली परिसरात जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी रबर स्ट्रिप्स, रंबल्स किंवा गतिरोधक बसवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी पहूर पोलीस ठाण्यात निवेदन देत, योग्य ती उपाययोजना न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.गावकऱ्यांच्या मते, पाळधी गाव हा जळगाव-छत्रपती संभाजीनगर या मुख्य महामार्गावर असून, आसपासच्या सोनाला, भराडी, नाचणखेडा, भिलखेडा, सार्व, जोगलखेडा, लाखोली या गावातील विद्यार्थी श्रीमती क.द. नाईक माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी येत असतात. तसेच बाहेरगावी जाण्यासाठी देखील या मार्गाचा उपयोग केला जातो. गावातील जिल्हा परिषद मुलांची शाळा आणि कन्या शाळाही महामार्गालगत असल्याने शाळकरी मुलांना दररोज रस्ता ओलांडावा लागतो.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, महामार्गावर वाहनांची वर्दळ जास्त असल्यामुळे अनेकदा अपघात होतात आणि यामध्ये जीवित हानीही झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.निवेदनात, महामार्ग प्राधिकरण आणि रोड कॉन्ट्रॅक्टरला भविष्यातील कोणत्याही अपघाताला जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या १० ते १५ दिवसांत उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads