पहुर पोलीस स्टेशनला नवीन पोलीस अधिकाऱ्याची मागणी: ग्रामसभेत ठराव, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...
जामनेर तालुक्यातील पहुर कसबे ग्रामपंचायतीने पोलीस ठाण्यातील मुख्य अधिकाऱ्याची बदली करून नवीन पोलीस अधिकारी नियुक्त करण्याचा ठराव मंजूर केला आहे. गावात वाढत्या चोरीच्या घटना आणि अवैध धंद्यांमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी हा ठराव एकमताने मंजूर केला.ग्रामसभा दरम्यान गावात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले चोरीचे प्रकार आणि अवैध धंद्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. विशेषतः गावठी दारू अड्डे आणि सट्टा दुकाने खुलेआम चालू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे पहुर पोलीस स्टेशनला नवीन अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती होणे आवश्यक असल्याची ठरावाच्या माध्यमातून जोरदार मागणी करण्यात आली.ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांनी ठराव सुचवला, तर तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन लहासे यांनी त्याला अनुमोदन दिले. माजी सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, आणि अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ देखील उपस्थित होते.ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन त्यांच्या समोर निवेदन सादर केले. याशिवाय, जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही निवेदन देण्यात आले असून, ग्रामसभेत मंजूर ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.ठरावाच्या मागणीसाठी पुढील कारवाई पहुरच्या शेतकरी आणि ग्रामस्थांच्या या मागणीस आता प्रशासन कशाप्रकारे प्रतिसाद देईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा