शिरवळ येथे पाणी संघर्ष समितीच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व गावातील शेतकरी बांधवांचा आमरण उपोषण सुरू.... - दैनिक शिवस्वराज्य

शिरवळ येथे पाणी संघर्ष समितीच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व गावातील शेतकरी बांधवांचा आमरण उपोषण सुरू....


समीर शेख प्रतिनिधी
   सोलापूर : उजनीचे पाणी शिरवळ धरणात सोडण्यात यावी या एकमेव मागणीसाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित आमरण उपोषणास पंचक्रोशीतील सर्व गावातील शेतकरी बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.जोपर्यंत तलावात पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. शिरवळ तलावात पाणी सोडल्यास आसपासच्या गावातील औज, कणबस, इंगळगी,जेऊर बोरूळ,आलेगाव, हंद्राळ, करजगी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. गेल्या महिन्याभरापासून पंचक्रोशीतील सर्व गावातील शेतकरी बांधव आपल्या ग्रामपंचायतीच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय पाणीपुरवठा कार्यालय लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले दोन वर्षापासून तलाव पूर्णपणे कोरडा असून यावर्षीही पावसाचा पूर्ण हंगाम संपला असताना देखील एक थेंब सुद्धा तलावत पाणी नाही येणाऱ्या काळात पाणी नाही सोडल्यास आगामी होणाऱ्या निवडणुकीत सर्व शेतकरी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा
निर्धार करत आहेत.तरी यावर लवकरच प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरच मार्ग काढून पाणी कसे शिरवळ तलावात कसे येईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्व ग्रामस्थांमधून होत आहे.
    यावेळी गावचे सरपंच शरणप्पा गौडनुरू, उपसरपंच बसवराज पाटील,पोलीस पाटील सावळेश्वर, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन काशीनाथ तद्देवाडी, नागनाथ रामपुरे, महादेव बिराजदार, गंगाधर बिराजदार, नागनाथ माळगे, चिदानंद बिराजदार, मलकारी बिराजदार व शिरवळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    🔴आज आमरण उपोषणाला चार दिवस सुरू असून आज पर्यंत उजनीच्या पाण्यासाठी या धुबधुबी तलावात पाणी आलेलं नाही आणि जोपर्यत पाणी येत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. सध्या माझी तब्येत खालावली असून माझं प्राण गेलं तरी चालेल पण जोपर्यत पाणी येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही.
                                                                       उपोषण कर्ता
                                                                  गौरीशंकर बिराजदार
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads