महाराष्ट्र
अंत्रोळी प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना सोलापूर यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श लिपिक व गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सोहळा संपन्न....
सोलापूर (अंत्रोळी) : शनिवार दि. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सोलापूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना सोलापूर यांच्या वतीने पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुभाषराव माने (सर) अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे तथा नियंत्रक समिती सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक हे होते.
या कार्यक्रमास रावसाहेब मिरगणे शिक्षण उपनिरक्षक पुणे विभाग, एम. डी .कमळे सर सचिव सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ, डॉ. वैभव राऊत पोषण आहार लेखाधिकारी, नागेशजी बिराजदार माजी चेअरमन बाळे सोसायटी,प्राचार्य पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख उपस्थित मान्यवर याच्या हस्ते समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना सोलापूर याच्याकडून सर्व उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
व तसेच प्रथमता तुकाराम गौरप्पा शेजाळे व यांना लिपिक जीवन गौरव पुरस्कार हा विशेष सत्कार व तसेच 13 आदर्श लिपिक व 12 गुणवंत सेवक पुरस्कार प्रधान करण्यात आले.
या कार्यक्रम सचिव मुस्ताक रहिमान शेतसंदी,अध्यक्ष रविकांत सुर्वे, दक्षिण सोलापूर चे अध्यक्ष स्वामी सर, रत्नाकर लोंढे, प्रकाश आळंगे, कार्याध्यक्ष महेश रामशेट्टी, शिवाजी थिटे,रत्नाकर लोंढे,हणमंत मोरे, मोहन मोरे, श्रीशैल तळवार, विजयकुमार माने, व्यंकटेश रच्चा, रमेश इंडे व सोलापूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकेतर सेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्याने हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या संपन्न झाला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा