पुन्हा ना.श्री.गिरीश महाजन निवडणुकीच्या रिंगणात, पक्ष नेतृत्वाचा ठाम विश्वास - दैनिक शिवस्वराज्य

पुन्हा ना.श्री.गिरीश महाजन निवडणुकीच्या रिंगणात, पक्ष नेतृत्वाचा ठाम विश्वास

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर: भारतीय जनता पक्षाने सलग सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी देऊन  ना. श्री .गिरीश महाजन यांच्यावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा, भाजपा अध्यक्ष श्री. जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय निवडणूक समितीतील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
गिरीश महाजन यांनी पक्षाच्या या विश्वासाला सार्थ ठरवत जामनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेची पुन्हा एकदा समर्पित भावनेने सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत महाजन यांच्यासह एकूण 98 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. महाजन यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत, सर्वांना आगामी निवडणुकीत भव्य विजय मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads