जनसेवक महादेव कोगनुरे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर.....
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोडी समोर आले असून काँग्रेस पक्षाला धक्का देत एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कैवारी , दिन दलितांचे आधारवढ ,सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी भल्यासाठी एकच ध्यास दक्षिण तालुक्याचा विकास तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जनसेवक कार्यसम्राट एम के फौंडेशन चे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुबंई येथील निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन दक्षिण मध्ये सुसाट धावण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.कारण त्यांना दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मनसेने कोगनुरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक चांगलीच रंगणार आहे.
महादेव कोगनुरे यांची ओळख, त्यांचा स्वभाव आणि सामाजिक कार्याची पद्धत पाहता यंदा ते सर्वांचे अंदाज चुकवणार असून दक्षिण मध्ये चमत्कार घडवतील अशी चर्चा आता कार्यकर्ते करू लागले आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा