महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतिने समुपदेशन व जटा निर्मुलन.... - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतिने समुपदेशन व जटा निर्मुलन....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती सोलापूर शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी 55 वर्षाच्या एक महिला त्यांना वर्षापासून आलेली जवळ जवळ एक किलो वजनाची जट काढून टाकून त्यांची असंख्य त्रासातून सुटका केली. 
     गेल्या वर्षभरापासून त्याच्या डोक्यात जट निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना झोपताना त्रास होत असे. मान दुखणे, पाठ दुखणे, डोकं दुखणे इ. अनेक शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी होत्या. हि माहिती कळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती सोलापूर शहर शाखेचे कार्यकर्ते डॉ. अस्मिता बालगावकर, निशा भोसले, शकुंतला सुर्यवंशी, लता ढेरे, आर. डी. गायकवाड यांनी तातडीने त्यांची भेट घेतली. 
     सुरवातीला त्या ती जट काढण्यास तयार नव्हत्या. त्यांना मानसशास्त्रीय समुपदेशन करून, समजावून सांगून जट काढण्यासाठी तयार करण्यात आले. मग कार्यकर्त्यांनी त्यांच्या जटेचे निर्मुलन केले. नंतर घ्यावयाची दक्षता सुद्धा सांगण्यात आली. यात त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads