जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे काटेकोर पालनाचे आवाहन - दैनिक शिवस्वराज्य

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे काटेकोर पालनाचे आवाहन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी केली असून, त्यानुसार जळगाव जिल्ह्यात आचार संहिता लागू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांना केले आहे.आचार संहितेच्या अनुषंगाने, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अंतर्गत सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, फलक, झेंडे किंवा निवडणूक चिन्ह विना परवाना लावण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित करण्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे विद्रुपण करणाऱ्या राजकीय पक्षांनी तत्काळ मालमत्तेवरील सर्व प्रकारचे साहित्य काढून टाकण्याची जबाबदारी घ्यावी, असेही निर्देश दिले आहेत.आचार संहिता उल्लंघन केल्यास महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अंतर्गत दोषींना तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षांचे प्रावधान आहे.जिल्हाधिकारी प्रसाद यांनी राजकीय पक्षांसोबतच जनतेलाही निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, आचार संहितेचे पालन करण्यावर जोर दिला आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads