महाराष्ट्र
अंत्रोळी येथे ऊर्स ए गौस ए आजम महिबूब सुभानी ऊरूस उत्सव उत्साहात साजरा..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे ऊर्स ए गौस ए आजम महिबूब सुभानी ऊरूस उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
दि. 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता (संदल) गावातुन मिरवणूक कार्यक्रमास सुरुवात झाली व रात्री नऊ वाजता मिरवणूक कार्यक्रम संपन्न झाला व मिरवणूक कार्यक्रमानंतर (संदल) कार्यक्रम संपन्न झाले.
ऊर्स ए गौस ए आजम महिबूब सुभानी ऊरूस निमित्त या संदल कार्यक्रमानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व गावातील तमाम हिंदू मुस्लिम बांधव उत्साहात या उरूसात सहभाग नोंदवले.या उरुसाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडल्याचे जेष्ठ नागरिक मजनोद्दीन पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमास मंद्रूप पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे
कंदलगाव बिट अंमलदार माने व पोलीस पाटील व अंत्रोळी येथील हिंदू मुस्लिम बांधवांचे सहकार्य लाभले. या सर्वाचे ऊर्स कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जेष्ठ नागरिक मजनोद्दीन पठाण यांनी आभार मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा