ब्रेकिंग न्युज ! दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसला सुटली ; दिलीप माने यांच्या निवास समोर जल्लोष - दैनिक शिवस्वराज्य

ब्रेकिंग न्युज ! दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसला सुटली ; दिलीप माने यांच्या निवास समोर जल्लोष


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांच्या भावना लक्षात घेत माजी आमदार दिलीप माने बंडाचे निशान फडकावत 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली.
      त्या नंतर काहीच वेळात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी संपर्क साधून तातडीने दिलीप माने यांच्या पुन्हा निवासस्थानी येऊन दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्ष आपल्याकडे सोडवून घेण्यात यशस्वी झाल्याची माहिती दिली.त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
     काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी काही वेळातच जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून दिलीप माने यांचे नाव निश्चित असेल असा विश्वास नरोटे यांनी व्यक्त केला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads