प्रफुल्लभाऊ लोढा यांची घरवापसी.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश - दैनिक शिवस्वराज्य

प्रफुल्लभाऊ लोढा यांची घरवापसी.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर – जामनेर तालुक्यातील आरोग्यदूत आणि सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्लभाऊ लोढा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोढा यांच्या या घरवापसीमुळे तालुक्यात भाजपा पक्षाला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.प्रफुल्लभाऊ लोढा यांचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा अनुभव असून, त्यांनी आरोग्यदूत म्हणून जनतेमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाचे स्थान जामनेरमध्ये अधिक मजबूत होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा यांचे स्वागत करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि तालुक्यातील भाजपाच्या लोककल्याणकारी कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याबाबत विश्वास व्यक्त केला.प्रफुल्लभाऊ लोढा यांनी भाजपा पक्षात प्रवेश करताना सांगितले की, भाजपाचे विचार आणि विकासकार्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. तालुक्याच्या विकासासाठी मला भाजपा व्यासपीठातून काम करण्याची संधी मिळत आहे, याचा अभिमान वाटतो.लोढा यांच्या घरवापसीच्या या घडामोडीमुळे तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांनी यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads