दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी रिपब्लिक सेनेचे वतीने सिद्धार्थ कांबळे यांना उमेदवारी जाहीर... - दैनिक शिवस्वराज्य

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी रिपब्लिक सेनेचे वतीने सिद्धार्थ कांबळे यांना उमेदवारी जाहीर...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने वडापूर गावचे रहिवासी तथा रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ उर्फ सिद्राम कांबळे यांना रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते एबी फॉर्म नुकतेच देण्यात आले. दि. 29 ऑक्टोबर रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना सांगितले.
    महायुतीच्या सरकारने आणि महाविकास आघाडीने सर्वसामान्य जनतेची व एससी एसटी ओबीसी आरक्षणवादी जनतेची अद्यापपर्यंत दिशाभूल करून सत्तेचे राजकारण केले. त्यांना मिळणारे आरक्षण घालवण्याचा प्रयत्न केला असून त्यांना योग्यरीत्या न्याय देण्यात आले नाही. तरी सध्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर व तसेच ओबीसी आघाडीचे संयोजक माजी मंत्री प्रकाश अण्णा शेंडगे, बी आर एस चे सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली 11 पक्षाची मूठ बांधून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र 288 जागा लढवण्यात येणार असून यातून आरक्षणवादी आघाडीची स्थापना झाली आहे.
    रिपब्लिकन सेनेचे दक्षिणचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे हे रिपब्लिकन सेनेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत असून दक्षिण तालुक्यामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विधायक कार्य केलेले असल्याने त्यांना मिळालेल्या उमेदवारीचा सार्थक होणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads