दक्षिणसाठी मनसेचे महादेव कोगनुरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ; दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्त्यांत उत्साहा....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महादेव कोगनुरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
पनाश अपार्टमेंट विजापूर रोड या मार्गावरून जात रेवणसिध्दे महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन थेट दक्षिण तहसील कार्यालय येथे जाऊन महादेव कोगनुरे यांनी आज अर्ज दाखल केला.त्यांच्या बरोबर मनसेचा फौजफाटा व एम के फाउंडेशन चे कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती.यावेळी त्यांच्या बरोबर एम के फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महादेव कोगनुरे म्हणाले की,सर्वसामान्य माणसांची भक्कम साथ माझ्या पाठिशी असल्यामुळे कोणतीही शक्ती आली तरी माझा पराभव करू शकत नाही.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्याच यादीत दक्षिण सोलापूर तालुक्यातून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि लगेचच आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील गावागावातून राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, सामान्य नागरिकांतून उत्साहा संचारला होता.उपस्थित जनसमुदाय समोर आपले विचार व्यक्त करीत शक्तिप्रदर्शन न करता सर्वसामान्य माणसांच्या समवेत जाऊन महादेव कोगनुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.अर्ज भरण्यासाठी भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे वातावरण जल्लोषपूर्ण झाल्याचं पाहायला मिळाले. उघड्या गाडीवर उभे राहून मतदारांना अभिवादन करत महादेव कोगनुरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कूच केली. सोलापूर येथे उमेदवारी अर्ज भरताना महादेव कोगनुरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, लोकसभा अध्यक्ष व शहर उत्तरचे उमेदवार प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, जिल्हा सचिव रोहित कलशेट्टी, शहर सचिव व शहर मध्य चे उमेदवार नागेश पासकंटी, जिल्हा उपाध्यक्ष सत्तार सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भंडारे, शहर उपाध्यक्ष आकाश निंबाळकर, विशाल गुजले, अमर कुलकर्णी, पवन देसाई यश महेंद्रकर दिनेश हंचाटे राहुल अक्कलवाडे प्रदीप बंडे अनिल भिसे व पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा