महाराष्ट्र
जोरदार शक्तीप्रदर्शन करत वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल..!
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : 251-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातुन वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व मार्ग फाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांसमवेत जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मार्ग फाऊंडेशनच्या ‘व्हाईट हाऊस’ मुख्य कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. डोक्यावर पक्षाच्या टोप्या,हातात झेंडा घेऊन पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.या रॅलीमध्ये हजारो समर्थकांनी उपस्थिती देऊन संतोष पवार यांना पाठिंबा दिला.
संतोष पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्नांवर भर देऊन या निवडणुकीत परिवर्तन घडवून जनतेच्या पाठिंब्याबरोबरच समाजकार्यातील प्रदीर्घ अनुभवाचा वापर करून प्रस्थापित नेते मंडळींना व त्यांच्या घराणेशाहीला शह देऊन दक्षिण सोलापूरमध्ये प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी ज्यायोगे . जनतेच्या कल्याणासाठी वंचितांच्या हक्कांसाठी,शैक्षणिक,सामाजिक, आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये विकास काम करून दक्षिण सोलापूरसाठी एक आदर्श विकासाचा मार्ग निर्माण करण्यासाठी हि निवडणूक जिंकणारचं असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे कार्यकर्ते मार्ग फाऊंडेशन आणि त्यांच्या समर्थकांनी एकजुटीने केलेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे पवार यांच्या उमेदवारीला व्यापक जनाधार मिळणार असल्याची चित्र दिसत आहेत. यावेळी मार्ग फाऊंडेशन आणि वंचित बहुजन आघाडी चे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा