महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आनंदाची बातमी ; दक्षिणचे उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज मंजूर... - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आनंदाची बातमी ; दक्षिणचे उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज मंजूर...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर मंद्रूप) : सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आनंदाची बातमी समोर आली असून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांनी अखेर मंजूर केला.
     दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार मिलिंद मुळे यांनी उमेदवार कोगणूरे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवल्याचे सांगितले. या अर्थावर दोन्ही बाजूंनी सोनवणे झाली निवडणूक अधिकारी सुमित शिंदे यांनी निकाल पाच वाजेपर्यंत राखून ठेवला होता. त्यांनी मिलिंद मुळे यांची हरकत फेटाळून लावत कोगनुरे यांचा अर्ज वैद्य ठरवला.
    यावेळी दरम्यान एडवोकेट कक्कळमेली यांनी अधिक माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
    मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, शहर उत्तरचे उमेदवार प्रशांत इंगळे, शहर मध्यचे उमेदवार नागेश पासकंटी, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे, सचिव रोहित कलशेट्टी हे प्रमुख पदाधिकारी दिवसभर निवडणूक निर्णय कार्यालयासमोर ठाण मांडून होते.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads