महाराष्ट्र
समीर शेख प्रतिनिधी
आरक्षणवादी आघाडीकडून दक्षिण सोलापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सचिन सोनटक्के यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज... ओबीसी बहुजन आघाडी न्याय हक्कांसाठी दक्षिणच्या मैदानात :- सचिन सोनटक्के
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : आरक्षणवादी आघाडीकडून सचिन सोनटक्के यांनी दक्षिण मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाचा विचार करता दक्षिण सोलापूर मध्ये आरक्षणवादी आघाडीने दृढ विचाराच्या जोरावर ही निवडणूक लढविणार आहे व सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता ओबीसी बहुजन आघाडी,रिपब्लिकन सेना,बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी,लोकराज्य पार्टी,जनहित लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सोनटक्के हे ओबीसी, दलित-बहुजनांसाठी नवीन पर्याय म्हणून समोर येताना दिसत आहेत.
यावेळी बोलताना सचिन सोनटक्के म्हणाले की, दक्षिण सोलापूर मध्ये सुमारे 70 ते 72 टक्के ओबीसी समाज असलेले तालुका आहे. तसेच पुढील विधानसभा असो महानगर पालिका , जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल किंवा पुढील कुठल्याही विधानसभेच्या वेळी आरक्षण वर जागा सुटल्यास सगळीकडे आम्ही लढू व अपक्ष देखील लढण्यास तयार आहे. आमचे मुद्दा ओबीसी व बहुजन आघाडी हे डोळ्यासमोर ठेवून या सर्वांना एकत्र घेऊन विकास करायचे आहे. तसेच आम्ही बोलून दाखवत नाही करून दाखवतो, दक्षिण मधील ओबीसी व बहुजनच्या जनतेशी एवढाच आवाहन करतो की, बदल घडवायचा असेल तर आम्हाला निवडून द्या,असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
यावेळी प्रकाश अण्णा शेंडगे,आनंदराज आंबेडकर,डॉ.सुरेश माने ,लक्ष्मण हाके ,प्रा टी.पी मुंडे, चंद्रकांत बावकर व कार्यकर्ते बहुसंख्येत उपस्थित होते.
Previous article
This Is The Newest Post
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा