ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना मोफत गृहपयोगी साहित्य वाटप...
जामनेर मतदारसंघातील तोंडापुर व फत्तेपूर येथे बांधकाम कामगारांना मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जामनेर मतदारसंघातील तोंडापुर व फत्तेपूर येथे बांधकाम कामगार बंधू भगिनींना मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. हा महत्वपूर्ण उपक्रम ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमादरम्यान मंत्री महाजन यांनी सर्व बांधकाम कामगारांसोबत संवाद साधत, महायुती सरकार कामगारांच्या कल्याणासाठी सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी सरकारकडून चालू असलेल्या विविध योजनांची माहिती देत, कामगारांच्या जीवनमान उन्नतीसाठी भविष्यात आणखी उपक्रम राबवण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी अनेक स्थानिक नेते, अधिकारी, आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा