वांगी येथील पीर महादेव प्रशालेत सायबर सुरक्षाचे मार्गदर्शन.... - दैनिक शिवस्वराज्य

वांगी येथील पीर महादेव प्रशालेत सायबर सुरक्षाचे मार्गदर्शन....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर ( मंद्रूप) : वांगी येथील पीर महादेव प्रशालेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणक शास्त्र संकुल व पुणे येथील क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात आला. 
   या उपक्रमामध्ये संगणक शास्त्र संकुलातील सुप्रिया शिंदे व शकुंतला बेल्ले या विद्यार्थिनींनी "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या विषयावर सेमिनार दिले. या सेमिनार मध्ये त्यांनी आजच्या ऑनलाइन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल महिती दिली.अश्या प्रकारच्या फसवणुकी होऊ नये म्हणून त्याबद्दल सर्वांनी काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली.OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबर वरून आलेल्या कॉल ची पडताळणी करून घेणे, पासवर्ड स्ट्राँग वापरून आपली माहिती सुरक्षित करावी तसेच आपली महिती ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले.मोबाईल, कॉम्प्युटर , लॅपटॉप इत्यादी साधनांवर अधिकृत अँटीव्हायरस चा वापर करावा.
   या कार्यक्रमास एकूण 228 विद्यार्थी प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads