जामनेरकरांना गिरीश महाजन हे हिर्‍यासारखे: देवेंद्र फडणवीस जामनेरात शिवसृष्टी व भीमसृष्टीचे भव्य लोकार्पण सोहळा संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरकरांना गिरीश महाजन हे हिर्‍यासारखे: देवेंद्र फडणवीस जामनेरात शिवसृष्टी व भीमसृष्टीचे भव्य लोकार्पण सोहळा संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 दि. 11 रोजी जामनेर शहराच्या राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आसनाधिष्ठ पुतळ्यासह शिवसृष्टीचे, तसेच भुसावळ चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि भीमसृष्टीचे भव्य लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. "गिरीश महाजन हे साधेसुधे नाहीत, ते अस्सल हिर्‍यासारखे आहेत, आणि त्यांची खरी पारख जामनेरकरांना आहे. गेल्या 30 वर्षांत जामनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे,असे ते म्हणाले. "महाजन यांनी एकदा एखादे काम ठरवले की, ते पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत. त्यांच्या सचोटीमुळे आणि कार्यक्षमतेमुळेच त्यांना 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाते, असेही फडणवीस यांनी म्हटले.यावेळी फडणवीस यांनी महाजन यांच्या कामावर भर देत, जामनेरकरांची महाजन यांना निवडून आणण्याची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. "गिरीश महाजन फक्त उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी जामनेरात येतील, आणि त्यांना निवडून आणणे हे जामनेरकरांचे कर्तव्य आहे. ते अपराजेय आहेत," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, रक्षाताई खडसे, खा. स्मिता वाघ, गिरीश महाजन, साधना महाजन, माजी खासदार उल्हास पाटील,आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, तसेच जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, रविंद्र झाल्टे, नाना बाविस्कर, तुकाराम निकम व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads