जामनेरात दरवर्षीप्रमाणे भव्य रावण दहन; मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावणाचे दहन - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात दरवर्षीप्रमाणे भव्य रावण दहन; मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावणाचे दहन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेरमध्ये दरवर्षीप्रमाणे श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
विजयादशमीच्या निमित्ताने जामनेर येथील श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शहरातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा बनला आहे, आणि यंदाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या उत्सवात मंत्री गिरीश महाजन यांनी रावणाचे दहन करत उपस्थित नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्सवाला रंगत आणली. रावण दहनाच्या माध्यमातून दुष्कर्मांवर सत्कर्मांचा विजय साजरा करण्यात आला, हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण होते.दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महाजन यांनी आपल्या भाषणात विजयादशमीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकत, सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मित्र मंडळाने यशस्वीरित्या पार पाडले, ज्याचे शहरभर कौतुक होत आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads