पिक विमा मिळण्यासाठी बेटावद खुर्द येथील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन... - दैनिक शिवस्वराज्य

पिक विमा मिळण्यासाठी बेटावद खुर्द येथील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
मागील बऱ्याच दिवसांपासून तालुक्यामध्ये संततदार पाऊस सुरू असून पोळा सणाच्या दिवशी तालुकाभरातील सर्व मंडळात दिवस रात्र संततधार अतिवृष्टी सारखा 65 मी मी पेक्षाही मोठा पाऊस झाला त्यानंतर सुद्धा नुकसानकारक पाऊस झाला असून शेतातील मका कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामी सर्व शेत पिकात सुमारे एक ते दोन फूट पाणी साचले असून नाल्यांनी प्रवाह सोडल्याने व पाणी जास्त झाल्याने बऱ्याच शेतात जास्तीचे पाणी घुसून बांधांची तुटपुट झालेली आहे म्हणून शासनाने याची दखल घेऊन पिक विमा अग्रीम 25% रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी व सन 2023 मधील काढणीपश्चात नुकसान या घटकाखाली मंजूर झालेली रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावी या मागणीसाठी बेटावद खुर्द येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी धडक देऊन निवेदने दिली आहेत तसेच निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांनी तात्काळ पिक विमा कंपनी जिल्हा प्रतिनिधींशी फोनवर बोलून शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याचे सूचना केल्या आहेत निवेदन देतेवेळी रोहन लोखंडे जीवन बरडे निलेश जाधव पंढरी गोसावी विजय मोतेकर निलेश शर्मा निलेश ढोले भगवान ढोले नितीन सोननी कैलास ढोले दिलीप माहेर योगेश भुसारी अतिश बरडे आकाश भुसारी गोकुळ भुसारी अनिल शर्मा अनिल पाटील राजेंद्र मातडे व इतर अनेक शेतकरी उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads