मार्ग फाऊंडेशनच्या वतीने भव्य कला महोउत्सव २०२४ "महापर्व कला उत्सवाचं " हा कार्यक्रम उत्साहात संपन्न.... - दैनिक शिवस्वराज्य

मार्ग फाऊंडेशनच्या वतीने भव्य कला महोउत्सव २०२४ "महापर्व कला उत्सवाचं " हा कार्यक्रम उत्साहात संपन्न....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग फाऊंडेशनच्या वतीने भव्य कला महोउत्सव २०२४ "महापर्व कला उत्सवाचं " हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 
   मेहंदी, रांगोळी, पाककला, चित्रकला,हस्तकला यांसह इतर अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.शहरातील कानाकोपर्यातील विविध वयोगटातील स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धकांनी आपापल्या कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा अप्रतिम आविष्कार सादर करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.ह्या स्पर्धेमुळे विविध कलांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळालं तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झालं.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कला महोउत्सवामुळे नवोदित कलाकारांनाही त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली आणि अनुभवी कलाकारांबरोबर अनुभवांची देवाणघेवाण करण्याचा योग आला.
    या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मार्ग फाऊंडेशनला स्थानिक कलाकार आणि कला प्रेमींकडून प्रशंसा मिळाली. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सायरा शेख ( समाज सेविका ), सोनल पांचाळ ( सौंदर्य तज्ञ) यांच्या हस्ते पार पडले , कार्यक्रमाच्या तशस्वितेसाठी आसिफ यत्नाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजिका उषा कसबे, तब्बसूम शेख, मिसबाह शेख, निकिता वाघमारे, वैष्णवी गवळी तसेच मार्ग फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्यांनी परिश्रम घेतले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads