महाराष्ट्र
कंदलगाव येथील जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत सायबर सुरक्षाचे मार्गदर्शन....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणक शास्त्र संकुल, क्वीक हिल फाउंडेशन पुणे आणि जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला कंदलगाव येथे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे प्राचार्य पी. एम. कमळे हे होते. यावेळी संगणक शास्त्र संकुलातील राहुल शिंदे व मोहिनी दुधाळ यांनी सांगितले की, फसवणूक होऊ नये म्हणून त्याबद्दल खात्री करूनच त्यावर विश्वास ठेवावा. त्यासाठी ओटीपी कोणास सांगू नये, अनोळखी नंबर बरून आलेले फोन कॉल्सची पडताळणी करावी. इतर व्हाट्सअप व सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करूनच पुढील प्रक्रिया करावी. पासवर्ड स्ट्रॉंग वापरून स्वतःची माहिती सुरक्षित करावी. त्यासाठी मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप आदी साधनांवर अधिकृत अँटीव्हायरसचा वापर करावा. या कार्यक्रमासाठी जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील एकूण 382 विद्यार्थीनींनी आपला सहभाग नोंदविला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे प्राचार्य पी. एम. कमळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि प्रशालेतील विद्यार्थ्यां बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक अनिल गावडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे शिक्षक आरुण गावडे यांनी मांडले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा