महाराष्ट्र
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024.... निवडणूक कालावधीत जप्त केलेल्या रक्कमेवर निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :- मा.भारत निवडणूक आयोग ,निवडणूक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 च्या अनुषंगाने निवडणूकीच्या दरम्यान जप्त केलेल्या रोख रक्कमेवर निर्णय घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये - प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर, खर्च संनियंत्रक नोडल अधिकारी , आणि जिल्हा कोषागार अधिकारी, या तीन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळविले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा