राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची धडाकेबाज कारवाई ; 2 लाख 92 हजार 500 दंड.... - दैनिक शिवस्वराज्य

राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची धडाकेबाज कारवाई ; 2 लाख 92 हजार 500 दंड....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर दि. 14 नोव्हेंबर( जिमाका)- विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्हयामध्ये दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी मौजे मुळेगाव तांडा बक्षी हिप्परगा वरळेगाव तांडा शिवाजीनगर तांडा परिसरात कारवाई करून अवैध हातभटटी दारू निर्मिती केंद्रावर कारवाई करून या कारवाईत एकुण 11 हजार 450 लीटर रसायन 575 लीटर हातभटटी दारू असा एकुण रूपये 7 लाख 14 हजार 995 चा प्रोव्हीबिशन गुन्हयातील मुददेमाल जप्त करण्यात आला.
      तसेच या विभागाकडुन अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देण्याऱ्या आठ ढाब्यांवरती कारवाई करून ब्रीथ ॲनलायझर चा वापर करून वैद्यकीय चाचणी नंतर सदर आठ मातोश्री ढाबा, दुर्गा ढाबा होटगी रोड, जयभवानी ढाबा मंगळवेढा रोड, सावजी कोल्ड्रिंक्स, कन्ना चौक, तसेच पंढरपुर कासेगाव येथील साईराजे, महाराजा ढाबा, तारापूर, माढा येथील राणा ढाबा, माळशिरस येथील सावनी ढाबा, यावर कारवाई करून ढाबा मालक व मद्यपी ग्राहकांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी रूपये 25 हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रूपये 3 हजार इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून एकुण रूपये 2 लाख 92 हजार 500 इतका दंड जमा करून घेण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारे अवैध ढाब्यांवर कारवाई यापुढे अशीच चालू राहणार आहे. परवाना नसणाऱ्या ठिकाणी मद्य प्राशन केल्याने संबंधित जागा मालक व मद्यपी या दोघांवर कारवाई होऊ शकते याची नोंद संबंधितानी घ्यावी.
     आचारसंहिता कालावधीमध्ये दि 15 ऑक्टोबर 2024 ते दि. 13 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्हयात एकुण 259 गुन्हे नोंद करण्यात आले असून 257 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कालावधीत केलेल्या कारवाईत 91 हजार 230 लीटर गुळमिश्रित रसायन, 7 हजार 788 लीटर हातभटटी दारू, 1 हजार 671 लीटर ताडी, 943 ब.ली. देशी दारू, 618 लीटर विदेशी दारू, 77.97 ब.लीटर बिअर 83.88 ब.ली. बनावट विदेशी मद्य व 59 वाहनासह एकुण 1 कोटी 42 लाख 21 हजार 344 इतका मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई निरीक्षक श्री.आर.एम.चवरे, श्री.जे.एन.पाटील, श्री.अे.व्ही.घाटगे, श्री.डी.एम.बामणे श्री. पंकज कुंभार, श्री भवड, तसेच दुय्य्म निरीक्षक श्री.एस.डी.कांबळे, श्री आर एम कोलते, श्री धनाजी पोवार, श्री समाधान शेळके, श्री सुखदेव सिद, श्रीमती अंजली सरवदे, सचिन गुठे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरूदत्त भंडारी, आनंद जोशी, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, इस्माईल गोडीकट, कपील स्वामी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीराज तोग्गी, तानाजी जाधव, रेवणसिध्द कांबळे वाहनचालक रशीद शेख, दिपक वाघमारे व संजय नवले यांनी पार पाडली.
अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस ॲप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads