जामनेरात पत्रकारां बद्दल आक्षेपार्ह पोस्टमुळे पत्रकार बांधवात संतापाची लाट... तरुणावर गुन्हा दाखल
सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणाविरुद्ध जामनेर पोलिसांत आज गुन्हा दाखल करण्यात आला.
जामनेर – सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून समाजात चुकीचे संदेश पसरवल्याबद्दल जामनेर पोलिसांनी संदीप श्यामराव पाटील तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा वाद निर्माण झाला असून पत्रकार संघटनांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.संबंधित तरुणाने फेसबुकवर पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह शब्दांत पोस्ट केली होती, जी काही तासांतच व्हायरल झाली. या पोस्टमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या प्रकारामुळे पत्रकारांच्या प्रतिष्ठेवर आघात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.पत्रकार संघटनांचा तीव्र निषेध या प्रकारानंतर पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन जामनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन दिले आणि आरोपीविरुद्ध तातडीने कारवाईची मागणी केली. पत्रकारांनी असे प्रकार पत्रकारितेवर होणाऱ्या दबावाचे द्योतक असल्याचे म्हटले आहे.पोलिसांकडून चौकशी सुरु पत्रकारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे. पोलीस अधिकारी यांनी समाज माध्यमांचा गैरवापर रोखण्यासाठी अशा प्रकारांच्या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.सर्वत्र संतापाचे वातावरण या घटनेमुळे समाज माध्यमांवरही विविध प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणाची चौकशी आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा