अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड
जळगाव: अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजिज शेख यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून पंकज वसंत कोळी, सचिव म्हणून महेश राजगोपालजी राठी, आणि कार्याध्यक्ष म्हणून इरफान जाहीर शेख यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर रमेश खराटे, सचिव विकास शामराव शिरसाठ, कार्याध्यक्ष आकाश सुभाष उसराटे, आणि खजिनदार सुशील कैलास गणोरे हे मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर अजिज शेख यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे प्रदान केली.
नवीन शहराध्यक्षांची घोषणा सर्वत्र स्वागतार्ह
मुविकोराज कोल्हे यांच्या निवडीचे सर्वत्र उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात महाऑनलाईन केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
"सेतू चालकांच्या समस्या सोडविण्यासाठी ठाम प्रयत्न करणार" – मुविकोराज कोल्हे
यांनी सांगितले की, "संस्थापक अध्यक्ष अजिज शेख यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता, शहरातील महाऑनलाईन (सेतू केंद्र) व आधार सेवा केंद्र चालकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे."
जळगाव शहरातील महाऑनलाईन व आधार सेवा केंद्र चालकांसाठी ही निवड आनंदाची बातमी ठरली असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता नवीन नेतृत्व तयार आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा