ब्रेकिंग शिवस्वराज्य न्यूज:जामनेरात गिरीश महाजन यांच्या विजयासाठी जल्लोषाची तयारी सुरू... - दैनिक शिवस्वराज्य

ब्रेकिंग शिवस्वराज्य न्यूज:जामनेरात गिरीश महाजन यांच्या विजयासाठी जल्लोषाची तयारी सुरू...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांची आघाडी 24,792 मतांवर पोहोचली आहे, आणि निवडणुकीच्या केवळ तीन-चार फेऱ्या बाकी आहेत. त्यांच्या विजयाची शक्यता जवळपास निश्चित मानली जात असून, जामनेरात जल्लोषासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

शहरातील ठिकठिकाणी गुलाल, फटाके, ढोल-ताशांचे बुकिंग झाले आहे. महाजन समर्थकांनी साजरा करण्यासाठी मिठाईचे ऑर्डर दिल्या असून, "गिरीश भाऊ जिंदाबाद"च्या घोषणांनी परिसर दुमदुमू लागला आहे.

गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी समर्थकांची गर्दी वाढत आहे, तर अनेक ठिकाणी जल्लोषाचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. विजयाची औपचारिक घोषणा होताच, जामनेर शहर मोठ्या उत्सवाचे केंद्र बनेल, अशी शक्यता आहे.

प्रतिनिधी: नितीन इंगळे


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads