ब्रेकिंग शिवस्वराज्य न्यूज:जामनेरात संकटमोचक नामदार गिरीश महाजन यांच्या विजयाचा जल्लोष! कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह! - दैनिक शिवस्वराज्य

ब्रेकिंग शिवस्वराज्य न्यूज:जामनेरात संकटमोचक नामदार गिरीश महाजन यांच्या विजयाचा जल्लोष! कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर विधानसभा निवडणुकीत संकटमोचक आणि जनतेचे लोकप्रिय नेते गिरीश महाजन यांचा विजय जवळपास निश्चित होताच, जामनेर शहरात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांनी “गिरीश भाऊ जिंदाबाद”च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले आहे.

महाजन यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण जामनेर आनंदमय झाला आहे. विजयाच्या आनंदात कार्यकर्ते आणि समर्थकांनी मिरवणुकांचे आयोजन केले असून, शहरातील प्रत्येक चौकात आनंद साजरा केला जात आहे.

महाजन यांच्या समर्थकांनी हा विजय त्यांचा नेतृत्वगुण आणि विकासाच्या कामांची पोचपावती असल्याचे म्हटले आहे. "संकटाच्या वेळी गिरीश भाऊ नेहमीच आमच्यासोबत उभे राहिले, आणि त्यांची ही विजयी घोडदौड अजूनही कायम राहील," असे भावनिक उद्गार कार्यकर्त्यांनी काढले आहेत.

गिरीश महाजन यांच्या विजयामुळे जामनेरच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू होणार आहे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads