आज शिक्षणातील प्रश्नांचे उत्तर साने गुरूजी यांच्या विचारातून मिळू शकते :- हेरंब कुलकर्णी - दैनिक शिवस्वराज्य

आज शिक्षणातील प्रश्नांचे उत्तर साने गुरूजी यांच्या विचारातून मिळू शकते :- हेरंब कुलकर्णी


समीर शेख प्रतिनिधी
 सोलापूर : आज शिक्षण क्षेत्रात आपण असंख्य समस्या आणि अडचणींना सामोरे जात असताना त्या सर्वांचे उत्तर आपल्याला साने गुरुजी यांच्या विचारातून मिळू शकते असे प्रतिपादन हेरंब कुलकर्णी यांनी सोलापूर येथे केले. साने गुरुजींच्या 125 व्या जयंती वर्षा निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांसाठी साने गुरुजी या विषयावर 125 व्याख्यान देण्याचा अभिनव उपक्रम राबविणारे प्रसिद्ध लेखक, कवी, विचारवंत, शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचे सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी छत्रपति शिवाजी हायस्कूल सोलापूर येथे व्याख्यान झाले. 
       सदर कार्यक्रमास 150 शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते. आत्ताच्या काळात शिक्षण व्यवस्थेत आपण साने गुरुजींच्या विचारांनी कशा पद्धतीने कार्य करू शकतो आणि विविध उपक्रम राबवून येणारी पिढी कशी घडवू शकतो याची असंख्य उदाहरणे देवून हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षकांसाठी मौलिक मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक अत्यंत मंत्रमुग्ध गुंग होऊन व्याख्यान ऐकण्यात मग्न झाले होते. 
      सदर या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. अस्मिता बालगावकर, छत्रपति शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जुगदार मॅडम, उपमुख्याध्यापिका साठे मॅडम, सपाटे मॅडम, जगदाळे सर, जगताप सर, काळे सर तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते प्रसाद अतनुरकर, यशवंत फडतरे, शकुंतला सूर्यवंशी, प्रकाश वाघमारे, सिद्धाराम बगले व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads