खासदार अमोल कोल्हे यांचे जामनेरात हेलिकॉप्टरने भव्य आगमन; जळगाव रोडवरून रोड शोला सुरुवात
जामनेर – महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप बळीराम खोडपे (सर) यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांचे आज जामनेरमध्ये हेलिकॉप्टरने भव्य आगमन झाले आहे. जळगाव रोडवर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले असून, लवकरच भव्य रोड शोला सुरुवात झाली आहे.
अमोल कोल्हे यांच्या आगमनानंतर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीत स्वागत केले गेले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले आहे.
रोड शोची सुरुवात: जळगाव रोडवरुन हा रोड शो सुरु असून, जामनेर आणि आसपासच्या गावातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी जमले आहेत. त्यांच्या सहभागामुळे रोड शोला भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे आणि दिलीप खोडपे यांच्या प्रचाराला एक वेगळीच उर्जा मिळणार आहे.
कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा रोड शो एक ऐतिहासिक क्षण ठरणार असून, जामनेरातील जनतेनेही या रोड शोची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा