बोदवड तालुक्यातील पत्रकार संघटनेचा निर्णय: सर्व राजकीय पक्षांच्या बातम्यांवर बहिष्कार - दैनिक शिवस्वराज्य

बोदवड तालुक्यातील पत्रकार संघटनेचा निर्णय: सर्व राजकीय पक्षांच्या बातम्यांवर बहिष्कार

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
बोदवड तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या बातम्यांवर स्थानिक पत्रकार संघटनेने बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील पत्रकारांना राजकीय नेत्यांकडून योग्य मान-सन्मान मिळत नसल्याचा आरोप करत पत्रकारांनी हा कठोर पाऊल उचलले आहे.

पत्रकार संघटनेने म्हटले आहे की, तालुक्यातील राजकीय नेते आणि पदाधिकारी स्थानिक पत्रकारांना डावलून फक्त वरिष्ठ पातळीवरूनच बातम्या प्रसिद्ध करत आहेत. पक्षांच्या कार्यक्रमांविषयी कोणतीही प्रेस नोट किंवा माहिती पत्रकारांना दिली जात नसल्याने पत्रकारांमध्ये नाराजी आहे. यामुळे स्थानिक पत्रकार आणि राजकीय नेते यांच्यातील संवाद पूर्णपणे तुटला आहे.

निवडणुकीनंतरही बहिष्कार कायम
आज, १५ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होणारा हा बहिष्कार निवडणुकीनंतरही कायम ठेवण्याचा निर्धार पत्रकारांनी व्यक्त केला आहे. पत्रकारांच्या मते, हा निर्णय राजकीय नेत्यांना त्यांच्या वागणुकीचा पुनर्विचार करण्यासाठी भाग पाडेल.

तालुक्यातील या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पत्रकार संघटनेच्या या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads