राज्यस्तरीय पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2024: अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर - दैनिक शिवस्वराज्य

राज्यस्तरीय पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2024: अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर: राज्यातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी आयोजित केली जाणारी पिक स्पर्धा योजना यंदा रब्बी हंगाम 2024 मध्येही राबविण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ घडवून आणणे आणि त्यांच्याद्वारे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आहे.

यंदाच्या रब्बी हंगामातील स्पर्धेसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती स्वतःच्या कसात असणे आवश्यक आहे. सहभागी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे.

अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे:
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रपत्र 'अ' मध्ये अर्ज करावा लागेल. यासोबत प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२ व ८-अ उतारे, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास) आणि शेताच्या क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा जोडणे आवश्यक आहे. अर्जाची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.

प्रवेश शुल्क सर्वसाधारण गटासाठी प्रति पिक 300 रुपये तर आदिवासी गटासाठी प्रति पिक 150 रुपये आहे. शेतकरी एका किंवा एकापेक्षा जास्त पिकांसाठी अर्ज करू शकतात.

बक्षीस योजना:

तालुका स्तर:

प्रथम पारितोषिक: ₹5,000

द्वितीय पारितोषिक: ₹3,000

तृतीय पारितोषिक: ₹2,000


जिल्हा स्तर:

प्रथम पारितोषिक: ₹10,000

द्वितीय पारितोषिक: ₹7,000

तृतीय पारितोषिक: ₹5,000


राज्य स्तर:

प्रथम पारितोषिक: ₹50,000

द्वितीय पारितोषिक: ₹40,000

तृतीय पारितोषिक: ₹30,000



स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन:
तालुका कृषी अधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि शेती उत्पादन वाढीस चालना मिळेल.

शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या पिकांची उत्पादकता दाखवून उत्कृष्ट बक्षिसे जिंकावीत.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads