स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: ४ दुचाकी हस्तगत, चोरटा जेरबंद - दैनिक शिवस्वराज्य

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: ४ दुचाकी हस्तगत, चोरटा जेरबंद

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव: जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटरसायकली चोरून त्यांचा विक्रीसाठी विल्हेवाट लावणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत १ लाख ३० हजार रुपयांच्या ४ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

चोरीचा प्रकार उघडकीस
जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटरसायकल पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील गोपाल तेली (वय ४२) वापरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पथकाने त्याचा शोध घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदारांसह जिल्ह्यातून अनेक मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

चोरीस गेलेल्या मोटरसायकली जळगाव शहर, जिल्हा पेठ, भुसावळ बाजारपेठ आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यात नोंद झालेल्या आहेत. गोपाल तेलीला पुढील कारवाईसाठी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन देशमुख, विनोद पाटील, विष्णू बिराडे, ईश्वर पाटील आणि राहुल महाजन यांच्या पथकाने केली.

चोरीस अधिक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता

अजून काही मोटरसायकल चोरीचे प्रकरण समोर येण्याची शक्यता असून पोलिसांची तपास मोहीम सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.संपर्क: स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads