जीडीसी ॲण्ड ए आणि सीएचएम परिक्षेचा निकाल जाहीर.... - दैनिक शिवस्वराज्य

जीडीसी ॲण्ड ए आणि सीएचएम परिक्षेचा निकाल जाहीर....


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर :- सहकार विभागामार्फत घेण्यात आलेल्या जीडीसी अँन्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा 2024 चा निकाल सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडुन घोषीत करण्यात आला असल्याची माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली.
   सदर निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परिक्षार्थ्यांना लॉगइन व पासवर्ड वापरुन पाहता येईल. तसेच पीडीएफ मध्ये https://sahakarayukata.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर "महत्वाचे दुवे मधील जी. डी. सी. अँन्ड ए मंडळ" येथे पहावयास उपलब्ध राहील.
       तसेच फेरगुण मोजणी करण्यासाठी परीक्षार्थीना दि 05 जानेवारी 2025 (रात्री 22.30) पर्यंत https://gdca.maharashtra. gov. in या वेबसाईटवर परिक्षार्थ्यांना लॉगइन व पासवर्डचा वापर करुन अर्ज करता येईल.फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थी यांनी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी 75 रुपये अधिक बँक चार्जेस याप्रमाणे चलनाव्दारे भरावे. बँक चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत दिनांक 05 जानेवारीपर्यंत राहील. सदर चलन बँकेत दिनांक 08 जानेवारी 2025 पर्यंत या कालावधीत भरणा करावे. विहित तारखेनंतर प्राप्त होणा-या अर्जावर विचार करण्यात येणार नाही.
         अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0217- 2629749 तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, ई ब्लॉक, पहिला मजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहनही सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads