गिरीश महाजन तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, जामनेरात भव्य जल्लोष - दैनिक शिवस्वराज्य

गिरीश महाजन तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, जामनेरात भव्य जल्लोष

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर, दि. 15 डिसेंबर: जळगाव जिल्ह्याचे संकटमोचक आणि प्रभावी नेते नामदार गिरीश महाजन यांनी आज नागपूर येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यानंतर जामनेरातील राजमाता जिजाऊ चौकात मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा करण्यात आला.
शपथविधीचे लाईव्ह प्रक्षेपण राजमाता जिजाऊ चौकात   दाखवण्यात आले. महाजन यांनी शपथ घेताच उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली, गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. "गिरीशभाऊ महाजन की जय!" च्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
गेल्या दोन कार्यकाळात गिरीश महाजन यांनी सरकारवरील संकटांना यशस्वीरीत्या हाताळले असून त्यांच्या कर्तृत्वामुळेच त्यांना तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. त्यांच्या नव्या कार्यकाळात जामनेरचा विकास आणखी वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
यावेळी जल्लोष सोहळ्यात भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, स्वीय सहाय्यक दीपक तायडे, सिनेट सदस्य दीपक पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, माजी नगरसेवक अतिष झाल्टे, बाबूराव अण्णा हिवराळे, सुहास पाटील, उल्हास पाटील, सुधाकर माळी, डॉ. संजीव पाटील, विलास हिवराळे, पिंटू चिप्पड, जालमसिंग राजपूत, पप्पू पाटील, तसेच गोविंद अग्रवाल, तेजस पाटील, राजमल भागवत, रविंद्र झाल्टे, आणि महेंद्र बाविस्कर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गिरीश महाजन यांच्या तिसऱ्या टर्ममुळे जामनेरच्या विकासाला नवा वेग मिळेल, असा आशावाद सर्वत्र व्यक्त होत आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads